आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आगीत महत्वाची कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन सह कार्यालयात पुर्णपणे जळून (Pune Fire News) खाक झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले.
फ्लॅटचे कुलूप तोडून १५ लाख रुपयांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी
बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार फायर ब्रिगेडने तत्काळ सात गाड्या घटनास्थळी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. चौथ्या मजल्यावर बँकेतील अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, खुर्च्या टेबलसह महत्वाचे साहित्य आगीत जळून खाक झाले (Pune Fire News) आहे. दरम्यान, या आगीत चलनातील काही नोटा जळाल्या की नाही, याची खात्री होऊ शकली नाही. याप्रकरणी संबंधित बँकेकडून रात्री उशिरापर्यंत काहीही खुलासा केला नाही.
कार्यालयातील एसी सुरु केल्यानंतर आग लागल्याचे उघडकीस आले. यावेळी कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर एक्सटिंशरचा वापर केला. मात्र, आग वाढत गेल्यानंतर त्यांनी अग्निशमक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीचे रौद्र रुप धारण केले होते. सुरुवातीला पथकाने पाण्याचा मारा करुन आग विझवण्यास प्राधान्य दिले. कार्यालयात कोणीही अडकले नसल्याची खात्री केली. अखेर सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवून, कुलिंगचे काम करण्यात आहे. या कामगिरीत ३५ ते ४० जवानांनी सहभाग घेतला होता. अग्निशमकचे मुख्य फायर अधिकारी गणेश सोनुने, स्टेशन ड्युटी ऑफिसर पंकज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आग विझवली.























