Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोष

कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोष

दरोडा, मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांचा तपास न्यायालयात पडला उघडा

marathinews24.com

पुणे – Nilesh Ghaywal MCOCA Acquittal  : दरोड्यासह संघटित गुन्हेगारीचा मोक्का लावून कारवाई केलेल्या प्रकरणात पोलिसांच्या तपासालाच न्यायालयात मोठे वळण मिळाले. फिर्यादीनेच पोलिसांचा घटनाक्रम फेटाळून लावत आपल्यावर दबाव टाकून तक्रार नोंदवून घेतल्याचे सांगितले. पंच आणि स्वतंत्र साक्षीदारांनीही पोलिसांच्या कारवाईला दुजोरा दिला नाही. सीसीटीव्ही फुटेजसह महत्त्वाचे पुरावेही कायदेशीर पद्धतीने सिद्ध करता न आल्याने विशेष मोक्का न्यायालयाचे अतिरिक्‍त न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निलेश बन्सीलाल घायवळ, संतोष आनंद धुमाळ, मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख, अक्षय दिलीप गोगावले, विपुल उत्तम माझीरे आणि कुणाल कैलास कंधारे अशी निर्दोष मुक्तता केली आहे.

प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

फिर्यादी राज कदम यांच्या ‘राज ऑटो’ गॅरेजमधून महिन्द्रा जीप जबरदस्तीने किंवा दरोडा टाकून नेल्याचा आरोप पोलिसांनी दि. १० सप्टेंबर २०१९ रोजी केला होता. मात्र, या घटनेच्या तब्बल दीड वर्षांनंतर (२४ डिसेंबर २०२१) कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात गँगस्टर निलेश घायवळसह ६ जणांवर दरोडा आणि ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयासमोर फिर्यादीनेच पोलिसांवर गंभीर आरोप करत बळजबरीने सह्या घेतल्याचे सांगितले आणि सर्व पंचही फितूर झाले.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, केवळ पूर्वीचे गुन्हे दाखल असल्याच्या आधारावर या प्रकरणातील संघटित गुन्हेगारी सिद्ध होत नाही. Nilesh Ghaywal MCOCA Acquittal या प्रकरणातील मूळ आरोपच पुराव्याअभावी सिद्ध न झाल्याने मोक्काचे आरोपही टिकले नाहीत. फिर्यादीची साक्ष, पंचांचे जबाब, स्वतंत्र साक्षीदारांची भूमिका आणि तपासातील त्रुटी यांचा विचार करून विशेष मोक्का न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

फिर्यादी राज चंद्रकांत कदम याने न्यायालयात पोलिसांच्या तपासावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत बसवून पोलिस आयुक्तालयात नेले. मोबाईल ताब्यात घेतला आणि कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. चोरीला गेलेली महिंद्रा जीप आणि ती सापडल्याच्या ठिकाणाबाबत साक्षीदारांच्या जबाबांत विसंगती आढळली. पोलिसांनी तपासातील महत्त्वाचा पुरावा म्हणून मांडलेल्या सीसीटीव्ही फुटेजलाही न्यायालयात कायदेशीर पद्धतीने सिद्ध करता आले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×