Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Suicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्या

Suicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत

marathinews24.com

पुणे – Suicide Case : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला ओढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. महिलेला पतीासून वेगळे राहण्यास भाग पाडून तिचे दागिने मोडण्यात आले. आरोपीच्या त्रासामुळे महिलेने आत्महत्या केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. अभिजित जगदीश शिंदे (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेचा भाऊ ओंकार काळे (वय ३१) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोमल दीपक शिंदे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित शिंदे याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. महिला विवाहित असल्याची माहिती त्याला होती. महिलेला पतीपसाून वेगळे राहण्यास भाग पाडले. त्यानंतर महिला आरोपीबरोबर राहू लागले. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिऊन तिला त्रास देत होता, तसेच तिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. Suicide Case त्याने तिला दागिने मोडण्यास भाग पाडले. आरोपीने तिला मारहाण केली होती. त्याच्या त्रासामुळे २२ सप्टेंबर रोजी महिलेने राहत्या घरात दुपारी साडेतीनच्या सुमारास आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.आरोपीला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×