Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकर

Anjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकर

मसापतर्फे अंजली मालकर यांचा कृष्ण मुकुंद पुरस्काराने गौरव

marathinews24.com

पुणे – Anjali Malkar Award : संगीत ही तरल, मौखिक विद्या आहे. त्याचे पुरावे, संदर्भ मिळविणे अतिशय क्लिष्ट असते. अशा कलेला शब्दांमध्ये अंकित करण्याचे आव्हान मी स्वीकारले. लोकांना शास्त्रीय संगीत आपलेसे वाटावे, त्याला मंदिरात न बसविता किंवा रस्त्यावर न आणता स्वत:चा दर्जा, मान मिळावा या हेतूने हिंदुस्थानी संगीताचा इतिहास अभ्यासला. ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ या संथोधनात्मक ग्रंथांच्या माध्यमातून स्वरांकित कलेला अक्षरांकित केले. पुरस्कारामुळे संगीत कलेला साहित्य दरबारात मान मिळाला आहे, असे भावोद्‌गार लेखिका, अभ्यासक आणि शास्त्रीय गायिका अंजली मालकर यांनी काढले.

हिवरा पहाडीच्या मुलीच्या रिपोर्टींगची उपमुख्यमंत्री सुनेत्राताईकडून दखल – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे संशोधनात्मक ग्रंथासाठी देण्यात येणाऱ्या कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्काराने ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) या ग्रंथांच्या लेखिका अंजली मालकर यांना मंगळवारी (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर (Anjali Malkar Award )यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना मालकर बोलत होत्या. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह सुनेत्रा मंकणी, देणगीदार मोहन गुजराथी मंचावर होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अंजली मालकर पुढे म्हणाल्या, कुठलाही इतिहास परिपूर्ण नसतो, त्याचा शोध घेताना अनेक अनुषंगिक पुरावे, चित्र, हस्तलिखिते यांचे संदर्भ शोधून अनुमान काढावे लागते. माझ्या सुदैवाने मला हे पुरावे, संदर्भ सापडत गेले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. यावेळी पं. विजय कोपरकर म्हणाले, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अंजली मालकर यांनी मोलाचे कार्य केले असून ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ हे ग्रंथ संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोगी ठरतील.

Anjali Malkar Award  पुरस्कारामागील भावना विशद करताना मोहन गुजराथी म्हणाले, आम्हा सर्व कुटुंबियांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूशी ऋणानुबंध जुळला आहे. माझे सासरे कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कार्याचे विशेष स्मरण रहावे या करिता त्यांच्या नावे संशोधनात्मक ग्रंथनिर्मितीसाठी हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.

डॉ. स्वाती महाळंक प्रास्ताविकात म्हणाल्या, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा प्राचिन आहे. भारतीयांच्या जीवनात पदोपदी संगीत भरले आहे. या क्षेत्रात अंजली मालकर यांनी संशोधनात्मक कार्य करून मोलाची भर घातली आहे. प्रसाद मिरासदार यांनी अंजली मालकर यांचा परिचय करून दिला. सुनेत्रा मंकणी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×