अज्ञात हल्लेखोराविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दगडाने ठेचून तरूणाला ठार मारल्याची घटना ८ ते ९ मे कालावधीत हांडेवाडी- होळकरवाडी रस्त्यालगत घडली आहे. हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. महमंदवाडी ) असे खून केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सगीर मुसा शेख (वय ३४ रा. महमंदवाडी ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात हल्लेखोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधार्थ तपास पथक रवाना करण्यात आले आहे.
पुणे – केअर टेकरांनी केली बनवाबनवी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुटूंबिय महमंदवाडीत राहायला असून, हनिफला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच, फुरसुंगी पोलिसांनी गुन्ह्याच्या कलमात वाढ केली आहे. दम्यान, हनीफचा मृतदेह हांडेवाडी- होळकरवाडी रस्त्यालगत आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी आजूबाजूची दुकाने, पेट्रोलपंप, सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले ओह. हल्लेखोर नेमका कोण आहे, खून कोणत्या कारणातून झाला, यादृष्टीने तपास पथक वेगाने काम करीत आहेत. पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.