Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वाहन चोरट्याला अटक, १४ लाखांची ६ वाहने जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे -काळेपडळसह चंदननगर परिसरातून दुचाकींसह मोटारीची चोरी करणार्‍या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक मोटार आणि ५ दुचाकी असा १४ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. स्वप्नील नागनाथ व्होनमाने (वय २३ रा. लेन नं. तीन अ, गजाजनन नगर समोर, फुरसुंगी, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी प्रकरणात तपास पथकाकडून शोध घेण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अंमलदार महादेव शिंदे व पोलीस अंमलदार नितीन ढोले यांना वाहन चोरट्याची माहिती मिळाली होती.

सराईताकडून गावठी पिस्तूलासह ३ काडतुसे जप्त; कोंढवा पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

चोरलेल्या दुचाकीसह चोरटा पाण्याच्या टाकीजवळ असताना पथकाने स्वप्नील व्होनमाने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ५ दुचाकी, मोटार चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×