भरधाव वाहन चालकाने जेष्ठ सुरक्षा रक्षकाला उडवले

वाळूखाली दबून बालकाचा मृत्यू

कर्वे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात १ मे रोजी कर्वे रस्ता परिसरात घडला होता. नंदकिशोर धोंडू महाडिक (वय ६०, रा. एरंडवणे गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. कुणाल मोरे (वय २७, रा. नवी पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाहन चोरट्याला अटक, १४ लाखांची ६ वाहने जप्त; काळेपडळ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर महाडिक हे मोरे यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. १ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास महाडिक कर्वे रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी गरवारे महाविद्यालय चौकाजवळ असलेल्या सिग्नलजवळ त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महाडिक यांचा ११ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

वर्षभरात कर्वेरस्त्यावर ५ जण ठार

शहरातील मध्यवर्ती वर्दळीच्या कर्वे रस्ता भागात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश अपघात भरधाव वाहन चालकांच्या चुकांमुळे घडले आहेत. गेल्या वर्षभरात कर्वे रस्ता भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मात्र, तरीही बेशिस्त चालकांमध्ये कोणताही सुधारणा होत नसल्याचे दिसून आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×