आरोपींविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – हॉटेल व्यवसायाच्या आडून चक्क अमली पदार्थांची विक्री करणार्या चालकासह संबंधित स्टाफवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगणमत करुन तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरसह त्यासाठी लागणारे हुक्का साहित्य हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे उघडकीस आले आहे. ते प्रति ग्राहकाला १ हजार २०० रूपयांत हुक्का अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून ३ हजार २१५ रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सीबीआय अन पोलिसांच्या नावाखाली तोतयांचा डाव – सविस्तर बातमी
नारायण मगर थापा (वय ३३ रा. शिवनेरीनगर, लेन नं.१५ कोंढवा ) चंदनकुमार श्रीतेवन राय ( वय २२ रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, साळुंखे विहार रोड, वानवडी ) इनायत मजिद सल्ला (वय ५२ रा. भाग्योदयनगर, कोंढवा) जावेद मलिक शेख (वय ४२ रा गोळीबार मैदान, कॅम्प) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यासह अमली पदार्थ विक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांकडून १० मे रोजी हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अमोल पिलाणे आणि पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचनमध्ये अवैधरित्या हुक्का सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकला असता, तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरसह त्यासाठी लागणारे हुक्का साहित्य मिळून आले.
तपास पथकाने सव्वा तीन हजारांचे तंबाखुजन्य हुवका फ्लेवर साहित्य जप्त केले. संबंधित चौघांविरूद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ या कलमान्वये वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, रमेश साबळे, पोलीस अंमलदार दया शेगर, अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, यतीन भोसल सोमनाथ कांबळे, अतुल गायकवाड यांनी केली.