चालक पोलिसांच्या ताब्यात
marathinews24.com
पुणे – रस्त्याच्या कडेला असलेल्या ५ दुचाकींना काळ्या रंगाच्या ‘थार’ चारचाकी वाहन चालकाने धडक दिली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास कोथरूडमधील निंबाळकर चौकातील दुकानासमोरील घडली आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजनुसार अलंकार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ॠषिकेश पुजारी (वय ३०, रा. कोथरूड) याला ताब्यात घेतले आहे.
हॉटेल चालक नव्हे अमली पदार्थ तस्कर, आरोपींविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थार वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विश्वेश विजय देशपांडे (वय ४१) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत याप्रकरणी ॠषिकेश पुजारी (वय ३०, रा. कोथरूड) याला ताब्यात घेतले आहे. संबंधित वाहन चालक पुजारी याने मद्य प्राशन केले होते का, याबाबत त्याची ससून रुग्णालयातून वैद्यकीय चाचणी केली. मात्र, ही चाचणी निगेटिव्ह आली असून त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती अलंकार पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली.
चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी
अपघातानंतर जोरदार आवाज झाल्यावर बाहेर येऊन पाहिले असता, पाच दुचाकींचे नुकसान झालेले दिसले. चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता, तो घटनास्थळावरून गाडी घेऊन पळून गेला. याप्रकरणी अद्याप कोणी जखमी झाले नसले तरी वाहनांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे संबंधित‘थार’ चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी हॉटेल चालक देशपांडे यांनी केली आहे.