वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Online Task Fraud : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ८ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४२ वर्षीय महिला वारजे भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास (ऑनलाइन टास्क) चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
सौंदर्य प्रसाधनाच्या डब्यातून अमली पदार्थांची तस्करी; महिला गजाआड – सविस्तर बातमी
सायबर चारेट्यांनी सुरुवातीला महिलेला एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून रक्कम गुंतविण्यास सांगितली. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केली. चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.
शेजाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात
किरकोळ वादातून शेजाऱ्यांकडून पतीला मारहाण होत असताना मध्यस्थी करणाऱ्या गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाला. भवानी पेठेत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सज्जाद बबलू मेमन, त्याची पत्नी सना (दोघे रा. भवानी माता मंदिराजवळ, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याची पत्नी भवानी माता मंदिर परिसरात राहायला आहेत. आरोपी दाम्पत्य शेजारी आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. १ सप्टेंबर रोजी फिर्यादी तरुण रात्री नऊच्या सुमारास घरासमोर थांबला होता. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आला. आरोपीने दुचाकी पायावर घातली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी फिर्यादी तरुणाच्या पत्नीने भांडणात मध्यस्थी केली. आरोपीच्या पत्नीने तरुणाच्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी तरुणाची पत्नी गर्भवती आहे. आरोपीने तिच्या पोटावर लाथ मारली. मारहाणीनंतर तिला त्रास जाणवू लागला. तरुण आणि त्याची पत्नी रुग्णालयात गेले. वैद्यकीय तपासणीत तिचा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गंभीर स्वरुपाची दुखापत केल्या प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शेगर तपास करत आहेत.























