Breking News
Pune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा

Pune Drug Smuggling : सौंदर्य प्रसाधनाच्या डब्यातून अमली पदार्थांची तस्करी

Pune Woman Police Assault

महिला गजाआड

marathinews24.com

पुणे – सौंदर्य प्रसाधनाच्या आडून सौंदर्य प्रसाधनांची तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभाग (कस्टम) आणि महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने ताब्यात घेतले. महिलेकडून एक कोटी रुपयांचे चरस जप्त करण्यात आले. अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर बँकाँकहून आलेल्या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून चरस आणल्याची माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला मिळाली. अमली पदार्थ तस्करी करणारी महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पथकाने तिला संशयावरुन ताब्यात घेऊन तिच्याकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा तपासणीत सौंदर्य प्रसाधनांचे दोन डब्बे सापडले. या डब्यांमधील पदार्थाची त्वरीत ‘ड्रग डिटेक्शन किट’द्वारे तपासणी करण्यात आली. डब्यात चरस असल्याचे उघडकीस आले. या डब्यात एक किलो २४३ ग्रॅम चरस सापडले. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत एक कोटी रुपये आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×