Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Lohegaon Minor Assault Case : लोहगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितेच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून चर्चा

Lohegaon Minor Assault Case : लोहगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितेच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून चर्चा

स्त्री आधार केंद्राच्या वतीने पोलीस ठाण्यात आणि पीडितेच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांना दिला धीर

marathinews24.com

पुणे – Lohegaon Minor Assault Case : ऑक्टोबर पुण्यातील लोहगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पीडितेच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात – सविस्तर बातमी 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्ते श्रीमती अनिता फडतरे-शिंदे आणि राखी सिंघवी संबंधित पोलीस ठाण्याला भेट देण्यात आली. तसेच पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. या वेळी दूरध्वनीद्वारे डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार देण्यात आला. Lohegaon Minor Assault Case प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यात आली.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्याबरोबरच तिचे आणि तिच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबाला एकटे पडू न देता त्यांना आवश्यक समुपदेशन, कायदेशीर मदत आणि सामाजिक आधार मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पीडित बालिकेची ओळख गोपनीय ठेवून तिच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्त्री आधार केंद्र सातत्याने पाठपुरावा करणार असून, पीडित कुटुंबाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×