Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Bus Theft : बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी

Pune Bus Theft : बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ महिलेच्या हातातील ७० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरी करण्यात आली. शिवाजीनगर ते डेक्कन जिमखाना प्रवासात हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनीता रमेश वाघचौरे (वय ६४, रा. राजश्री अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक एक, बालेवाडी हायस्ट्रीट, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने महिलेची ४९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटे ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वाघचौरे पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होत्या. बसमधील गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील बांगडी संमतीशिवाय चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्‍यान, दुसऱ्या घटनेत कामावर जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या तरुणीच्या खिशातील ६० हजार रुपयांचा मोबाईल चोरी करण्यात आला. कर्वेनगरमधील बस थांब्यावर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने मोबाईल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋतुजा अशोक विरकर (वय २५, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता कर्वेनगर ब्रिजखालील बस थांब्यावर विरकर कामावर जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्‍यावेळी त्‍यांचा मोबाईल चोरी करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×