केजमध्ये भव्य दिव्य स्वागत करून वृक्षारोपण
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – Vasundhara Dindi 2026 : जगदुरु श्रीरामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धन स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ या उपक्रमाचे प्रस्थान सोमवार (दि. २८) श्रीक्षेत्र परभणी येथील रामानंद संप्रदायाच्या मराठवाडा उप पिठातून झाले. या दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले असून, ते मराठवाडा (परभणी) पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम, जि. रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. दिंडीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपक्रमः प्रस्थान व समारोपः मराठवाडा (परभणी) उपपिठातून निघणारी ही दिंडी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार असून, तिथे दिंडीचा भव्य समारोप होणार आहे. याच दिवशी जगदूरु श्री रामानंदचार्य नरेंद्रचार्य यांचा साठवा वाढदिवस मुख्य मठावर साजरा केला जाणार आहे.
‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात – सविस्तर बातमी
पर्यावरण संवर्धन व जनजागृतीः वाढत्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षसंवर्धन, Vasundhara Dindi 2026 स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. दिंडीच्या प्रवासादरम्यान दररोज वृक्षारोपण केले जात असून नुकत्याच राबवलेल्या अभियानात अवघ्या १५ दिवसांत देशभरात सहा लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
शिस्तबद्ध वाटचाल आणि व्यवस्था दिंडीतील भाविक रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध रांगेत, एका तालात आणि लयीत सांप्रदायिक गजर करत पुढे मार्गक्रमण करत आहेत. दिंडीसोबत स्वतंत्र स्वच्छता सेवेकरी पथक, स्वतंत्र टॉलेट व्हॅन आणि पिण्याच्या पाण्यासाठी दोन स्वतंत्र टँकर नेहमी सज्ज असतात. आरोग्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरः दिंडीत सहभागी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली जात असून, त्यांना वेळेवर सकस आहार उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच प्रत्येक सहभागी यात्रेकरूची दिवसातून पाच वेळा विशेष अँप आणि क्युआर कोडच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवली जात आहे.
सामाजिक आणि मानवतावादी कार्यः रामानंद संप्रदायामार्फत मरणोत्तर देहदान (५६ हजारांहून अधिक संकल्पपत्रे भरली, २४३ हून अधिक देहदान), अवयवदान, ५३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा, तसेच ‘ब्लड इन नीड’ या नवीन अँपचे लोकार्पण असे विविध समाजोपयोगी कार्य सातत्याने केले जात आहेत. शैक्षणिक व शेतकरी सहाय्यः श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील शिक्षण संकुलाच्या माध्यमातून गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून सीबीएसई अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण दिले जात आहे.
तसेच कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी, बियाणे वाटप आणि आधुनिक शेती अवजारांचे वितरण करून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले जात आहे. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या मानवतावादी शिकवणीवर चालणारा रामानंद संप्रदाय पर्यावरण, मानवसेवा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये विविध सेवाभावी उपक्रमांतून सातत्याने कार्यरत आहे .दिंडी केज येथे दाखल झाली आसता दिंडीचे भव्य दिव्य स्वागत करून केज च्या नगराध्यक्षा सिताताई बनसोडे आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.























