विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका डाॅक्टरांकडून १४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नशा करताना झालेल्या वादातून पुण्यात मित्राचा खून – सविस्तर बातमी
याप्रकरणी रोहिणी सुकुमार खेमाणे (वय ३२, रा. सुघोष अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका डाॅक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय डाॅक्टरांचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे. आरोपी महिलेची डाॅक्टरांशी ओळख झाली. त्यानंतर महिलेने डाॅक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेने त्यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार देईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृहात जावे लागेल, अशी धमकी देऊन आराेपी महिलेने डाॅक्टरांकडून गेल्या महिनाभरात १४ लाख ३० हजार रुपये उकळले. महिलेने रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही चोरून नेली. ही वही परत हवी असल्यास आणखी दहा लाख रुपये द्यावे लागतील, अधी धमकी देऊन पुन्हा खंडणी मागितली. महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या डाॅक्टरांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे तपास करत आहेत.























