आरोपी स्वत:हून खडक पोलीस ठाण्यात हजर
marathinews24.com
पुणे – Crime News Pune : नशा करताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. मित्राचा खून केल्यानंतर आरोपी स्वत:हून खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली. आकाश उर्फ अक्क्या उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय ३०, रा. महात्मा फुले मित्र मंडळाजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३०, रा. महात्मा फुले मित्र मंडळाजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. रुपाली प्रमोद पाटोळे (वय ३०) हिने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात सायबर फसवणुकीसाठी बनावट खात्यांचा वापर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटोळे या भवानी पेठेतील जुना मोटार स्टँड परिसरात शेंगा, कणीस विक्रीची गाडी लावतात. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी रुपालीचा दीर आकाश हा घरी झोपला होता. सायंकाळी तो झोपेतून उठला. आंघोळ करुन तो घरात बसला होता. त्यावेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद घरी आले. Crime News Pune दोघांसोबत तो बाहेर पडला. रात्री साडेआठच्या सुमारास आकाश हा काशेवाडी परिसरातील वजन काट्याजवळ असलेल्या सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काशेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाने याबाबतची माहिती रुपाली यांना दिली.
त्यानंतर रुपाली तेथे गेल्या.
Crime News Pune तेव्हा आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर रुपाली या घटनेची माहिती देण्यासाठी खडक पोलीस ठाण्यात गेल्या. तेव्हा आकाशचा मित्र अजय उर्फ चोर राजा पोलीस ठाण्यात आला होता. त्याने नशा करताना झालेल्या वादातून आकाशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. खून केल्यानंतर तो घरी गेला. कपडे बदलून तो पोलीस ठाण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.























