Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Seva Majhe Yogdan Pune : ‘सेवा माझे योगदान’ अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Seva Majhe Yogdan Pune

१३ तालुक्यांत २४ हजार ७२४ नागरिकांचा सहभाग; ९ हजार ९५६ लाभार्थींना विविध उपक्रमांचा लाभ

marathinews24.com

पुणे – Seva Majhe Yogdan Pune : जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ तसेच दि. १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या अभियानांतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग, योग व ध्यान यांसह विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. ३० सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण २४ हजार ७२४ नागरिकांनी सहभाग नोंदविला असून, ९ हजार ९५६ लाभार्थींना विविध उपक्रमांचा लाभ मिळाला आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु – सविस्तर बातमी 

हवेली तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५३६ नागरिकांची उपस्थिती असून १ हजार १४ लाभार्थींना लाभ मिळाला आहे. त्यानंतर शिरूरमध्ये २ हजार ३३० नागरिक सहभागी झाले असून ९३२ लाभार्थींना लाभ मिळाला. खेडमध्ये २ हजार २५२ नागरिकांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून ९०९ लाभार्थींना लाभ मिळाला आहे. जुन्नरमध्ये २ हजार २३० नागरिक सहभागी झाले असून ८९२ लाभार्थींना लाभ मिळाला आहे.
इंदापूर तालुक्यात २ हजार १७८ नागरिकांचा सहभाग असून ८७९ लाभार्थींना लाभ मिळाला. Seva Majhe Yogdan Pune मावळमध्ये २ हजार ९२ नागरिक सहभागी झाले असून ८३७ लाभार्थींना, मुळशीमध्ये २ हजार ९ नागरिक सहभागी झाले असून ८०९ लाभार्थींना, तर पुरंदरमध्ये २ हजार ७० नागरिक सहभागी झाले असून ८२८ लाभार्थींना या उपक्रमांचा लाभ मिळाला आहे.

भोर तालुक्यात १ हजार ६४६ नागरिकांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून ६४८ लाभार्थींना लाभ मिळाला. दौंडमध्ये १ हजार ५४४ नागरिक सहभागी झाले असून ६३४ लाभार्थींना, बारामतीमध्ये १ हजार ४९३ नागरिक सहभागी झाले असून ५९७ लाभार्थींना, आंबेगावमध्ये १ हजार ३३४ नागरिक सहभागी झाले असून ५४९ लाभार्थींना, तर राजगडमध्ये १ हजार १० नागरिक सहभागी झाले असून ४२८ लाभार्थींना लाभ मिळाला आहे.

अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सामाजिक सहभाग याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी कालावधीतही विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी ‘सेवा माझे योगदान’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×