लोणीकंदजवळील पिंपरी सांडसमधील घटना
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : सासरच्या मंडळींकडून सातत्याने माहेरहून पैशांची मागणीसह कौटुंबिक छळामुळे महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही घटना १७ ऑक्टोबरला लोणीकंदजवळील भरतवाडी, पिंपरी सांडस गावात घडली आहे. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
पुण्यात दांडिया कार्यक्रमानंतर माराहाणीच्या घटना – सविस्तर बातमी
हिना असिफ पटेल (वय २१ रा. भरतवाडी, पिंपरी-सांडस, बागवान वस्ती, हवेली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आसिफ मशाक पटेल (वय २५) साहेरा बेगम मशाक पटेल (सासू, वय ४२) सिदीप मशाक पटेल (दीर, वय २३) यांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News) तर नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीम मुसा शेख (वय ४० रा. मातोजीनगर, पिंपरी-िंचचवड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शमीम शेख यांची मुलगी हिना आणि आसिफ यांचा ३० मे २०२४ रोजी निकाह झाला होता. त्यानंतर हिना सासरी नांदत असताना काही महिन्यांनी आरोपींनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरु केला. सततच्या त्रासाला कंटाळून हिनाने १७ ऑक्टोबरला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दीर, सासूला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.



















