Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र

Pune News

विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, नवउद्योजक व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Pune News : विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, नावीन्यपूर्ण उपाययोजनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाचे जनजागृती सत्र गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन – सविस्तर बातमी 

हे सत्र सकाळी ९.३० ते ११ या वेळेत बोट क्लब कॅन्टीनजवळील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मिनी सभागृहात होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुण्यातील सत्राचे आयोजन व समन्वय करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले असून या जनजागृती सत्रात ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची उद्दिष्टे, स्पर्धेत सहभागी होण्याच्या संधी आणि सहभागाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी संबंधित भागधारकांशी संवाद साधणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुकांना आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, नवउद्योजक, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती घेऊन जनजागृती सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश रा. वराडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×