चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. टपाल कार्यालयातील पाठीमागील बाजूचा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरी उचकटण्याचा प्रयत्न केला. याबाबत रास्ता पेठेतील टपाल कार्यालयातील अधिकारी सानिका सुबोध जोशी (वय ५५) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटना – सविस्तर बातमी
रास्ता पेठेतील सरदार रास्ते यांचा पेशवेकालीन वाडा आहे. या वाड्यात तळमजल्यावर टपाल कार्यालय आहेत. शनिवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी टपाल कार्यालय बंद करण्यात आले. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी टपाल कार्यालयातील पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी जाळी उचकटली. कार्यालयातील तिजोरी उचकटण्याचा प्रयत्न केला. (Pune Post Office Theft Attempt) सोमवारी (१९ ऑक्टोबर) टपाल कार्यालयातील पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी टपाल कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार अमोल गावडे तपास करत आहेत.




















