मद्यधुंद महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Assault Cases : लायटर मागितल्याप्रकरणी विचारणा केल्याने मद्यधुंद महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गालावर चापट मारल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ययाती मोतीगीर बामणे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शितल सुधाकर मोरे (वय ४८, रा. नोबल हॉस्पिटलजवळ, हडपसर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक सात येथील अॅनिस हॉटेलजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बामणे या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रात्री गस्तीवर असताना वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी सीआर मोबाइल वाहन बाजूला लावले होते. त्यावेळी आरोपी महिला तेथे आली. विनाकारण शिवीगाळ करुन लायटर मागितले. Pune Assault Cases फिर्यादी यांनी मला तु कसे काय लायटर मागितले अशी विचारणा केली असता आरोपीने पुन्हा शिवीगाळ करत त्यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर गोंधळ घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.
मद्यधुंद प्रवाशाकडून कॅब चालकाला मारहाण
मद्यधुंद प्रवाशाने कॅबचालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी मोटार पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विनायक लाडप्पा क्षीरसागर (वय २८, रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रवाशासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने एका ॲपवरुन कॅब नोंदणी केली होती. हडपसर येथील अमानोरा टाॅवर परिसरात रविवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास कॅब चालक तेथे आला. आरोपी दारू प्याला होता. ठरलेल्या ठिकाणी कॅब का घेऊन आला नाही? अशी विचारणा करुन आरोपीने कॅब चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्राला तेथे बाेलावून घेतले. कॅब चालकाला शिवीगाळ करुन मोटार पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.




















