भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकाच कुटूंबातील ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कॅण्टीन भागीदारीमध्ये चालवण्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल १ कोटी ३२ लाख ३० हजाराची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकाच कुटूंबातील ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या साथीदारांच्या ४ मोटारी जप्त – सविस्तर बातमी
राजेश आनंद ( वय ५२), वीणा राजेश आनंद (वय ४८), मुलगी बर्खा राजेश आनंद( वय ३५), चांदणी राजेश आनंद( वय २६) आणि मुलगा वंश राजेश आनंद ( वय२३,रा. तिरंगा चौक, कात्रज) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शिवराज मधुकर शिंदे (वय २८, दत्तनगर, आंबेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिवराजला तुम्हाला भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविदयालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅन्टीन, लॉंड्री, आणि मेडिकलच्या व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून भारती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय ललवाणी यांच्याशी भेट घडवून दिली. यानंतर त्यांच्या कार्यालयातील मामा नावाच्या व्यक्तीशी बोलणे सुरु आहे असे सांगण्यात आले. यानंतर वेळोवेळी व्यवसायासाठी १ कोटी ३२ लाख ३० हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खिलारे करत आहेत.