Breking News
जबरी चोरीप्रकरणी ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्याजादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांनापुण्यात बॉम्बस्फोट होणारच्या निनावी कॉलने खळबळप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे गुरुवारी उद्घाटनकुख्यात गजानन मारणेचा जामीन अर्ज फेटाळलातळजाई टेकडीवर तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटलेपुरस्कार मिळणं हा रोमांचित करणारा क्षण – अभिनेते गिरीश कुलकर्णीडिएपी खताऐवजी पर्यायी खते वापरण्याचे आवाहनज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारसराफाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस हवालदार निलंबित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे गुरुवारी उद्घाटन

पंतप्रधान मोदी २२ मे रोजी देशभरातील १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे करतील लोकार्पण

marathinews24.com

पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि. २२ मे) पुणे विभागातील केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर २०२२ मध्ये ‘अमृत भारत स्थानक’ योजना सुरू केली होती.

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत, देशभरातील १ हजार ३०९ स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. पंतप्रधान यांनी पहिल्यांदा ६ ऑगस्ट २०२३ आणि नंतर २६ फेब्रुवारी २०२४ अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मिकीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये परावर्तीत करण्यावर भर दिला गेला आहे.

आता या योजनेअंतर्गतचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, उद्या २२ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेच्या १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील १५ प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही स्थानके अत्याधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली, या सगळ्यासाठी एकत्रितपणे १७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला आहे.

यात महाराष्ट्रातील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश असून पुणे विभागातील केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) आणि लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी या दोन्ही स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.

केडगाव स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण

या प्रकल्पाचा एकूण खर्च १२ कोटी ५५ लाख रुपये असून केडगाव स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि आधुनिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

प्रवासी प्रवेश आणि संपर्क

तिकिट सेवेच्या सुव्यवस्थित अनुभवासाठी नवीन तिकीट कार्यालय तयार केले
प्रवाशांची ये-जा व वाहनतळासाठी सुधारित क्षेत्र रचना

फलाट उन्नतीकरण-
प्रवाशांच्या सुलभतेसाठी फलाटाच्या पृष्ठभागाचे नूतनीकरण
उन्हापासून व पावसापासून संरक्षणासाठी नवीन सीओपी (कव्हर्ड ओव्हरहेड प्लॅटफॉर्म) छत
भरपूर प्रकाश व आरामदायी अनुभवासाठी एलईडी दिवे आणि पंखे लावले.

पिण्याचे पाणी आणि स्वच्छता-
प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याच्या नवीन सुविधा
शुल्क देऊन वापरण्याच्या स्वच्छतागृहांचे बांधकाम, त्यामध्ये दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहाची सोय

सुरक्षा आणि संवाद-
गाड्यांच्या प्रत्यक्ष वेळेनुसार घोषणांसाठी (एनटीईएस आधारित) सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था
रेल्वेगाडीचा डबा मार्गदर्शक व फलाटावर गाडीच्या आवागमानाची माहिती देणारे इंडिकेटर
स्थानक परिसरात मार्गदर्शनपर नवीन नाम, दिशादर्शक फलक

सौंदर्यीकरण-
रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण व हिरवे पट्टे विकसित
स्थानकाचे सौंदर्यीकरण – सुधारित प्रवेशद्वार व रंगकाम

फर्निचर व सुविधा-
फलाटावर व प्रतीक्षालयात नवीन एसएस बाके व कचरापेट्या
सामान्य प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे उन्नतीकरण

लोणंद स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण

एकूण प्रकल्प खर्च १० कोटी ४८ लाख रुपये आहे. या स्थानकावर प्रवाशांची सोय, सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहेत.

प्रवासी संपर्क आणि प्रवेश-

आधुनिक तिकीट खिडक्यांसह रांगेसाठी पुरेशी जागा असलेले नवीन तिकीट कार्यालय

स्वतंत्र प्रवेश/निर्गमन मार्गासह सुधारित परिसर रचना

फलाट सुविधा-
फलाटाचा सुधारित पृष्ठभाग
ऊनपावसापासून संरक्षणासाठी सीओपी छताचा विस्तार
नवीन स्टील व ग्रॅनाइट बाक.
एलईडी दिवे व पंखे लावल्यामुळे ऊर्जेचा कार्यक्षम वापर

पाणी व स्वच्छता-
फलाटावर पिण्याच्या पाण्याची सुविधा
शुल्क भरून वापरण्याची स्वच्छतागृहे, सर्व फलाटांवर दिव्यांगांना सोयीस्कर सुविधा

माहिती प्रणाली-
अचूक व वेळेवर घोषणांसाठी (एनईटीएस आधारित) सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था
रेल्वेगाडीच्या डब्यांसाठी मार्गदर्शनपर व फलाटावर दिशादर्शक फलक
स्थानक परिसरात दिशादर्शक फलक

सौंदर्यीकरण व सुरक्षा-
कलात्मक सजावटीसह प्रवेशद्वाराचे सौंदर्यीकरण
फलाटावर व स्थानक परिसरात हिरवाई आणि वृक्षारोपण
त्रिभाषिक फलक
सौंदर्य व सुरक्षेसाठी नवीन ध्वजस्तंभ व उंच खांबावरील दिवे

अतिरिक्त सुविधा-
सामान्य प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे उन्नतीकरण
योग्य अंतरावर कचरापेट्या
वीजपुरवठा अखंड राहावा म्हणून इलेक्ट्रिक उपकेंद्र.

या दोन्ही स्थानकांचा पुनर्विकास ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत केला असून प्रवासानुभव, सहज प्रवेश व शहरी भागाशी एकात्मिकरण याने मोठे बदल घडून येत आहेत. पंतप्रधानांच्या आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top