Breking News
Crop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेKatkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहितीपीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरलाGender Equality Maharashtra : लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवाLuxury Bus RTO Action : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरुद्ध पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष तपासणी मोहीमNanded Pistol Arrest : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक, युनीट तीनची कामगिरीPune Drought Management : जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाNaval Kishore Ram Birthday : आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

कुख्यात गजानन मारणेचा जामीन अर्ज फेटाळला

दोषारोपपत्रासाठी पोलिसांना न्यायालयाने दिली ३० दिवसांची मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड गजानन मारणे याला पुणे पाेलीसांनी माेक्का कारवाईत अटक केल्यानंतर त्याला कारागृहात ठेवले हाेते. मारणेने त्याच्या वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, संबंधित जामीन अर्ज बुधवारी (दि. २१ ) पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याप्रकरणात पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यापासून पुणे पोलीस ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करू शकणार आहे.

तळजाई टेकडीवर तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांच्या चौकशीमध्ये गजा मारणे हा त्याच्या टोळीतील महत्वपूर्ण जवळच्या साथीदारांना वापरण्यासाठी ४ अलिशान फॉर्च्यूनर कार खरेदी करणार होता, ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारणेच्या ताब्यातून जप्त केलेली एक फॉर्च्युनर गाडी आणि एक थार गाडी ही त्याने दुसऱ्यांच्या नावावर घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोथरूडमध्ये एका अभियंताला मारहाण प्रकरणात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली असून, सराईत रुपेश मारणे हा इतर साथीदारांसह पसार आहे. जे आरोपी पसार झालेले आहेत त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आलेले असून त्यांना लवकरच फरार घोषित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मारणे टोळीतील साथीदारांच्या मालमत्ताबाबत पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×