Breking News
Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले

Katkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती

Katkari Welfare Schemes

न्यूक्लिअस बजेट, ठक्करबाप्पा, घरकुल तसेच जातीचे व पेसा दाखल्याबाबत जनजागृती

marathinews24.com

पुणे – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील इंदिरानगर, शिनोली येथील गणराज ग्रुपमध्ये कातकरी (Katkari Welfare Schemes) बांधवांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरला – सविस्तर बातमी 

आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक सम्यक ढवळे, अजय परदेशी आणि छाया ढुमणे यांनी उपस्थितांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये न्यूक्लिअस बजेट योजना, ठक्करबाप्पा योजना, घरकुल योजना तसेच पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कातकरी बांधवांना (Katkari Welfare Schemes) शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तसेच जातीचा दाखला मिळविण्याची प्रक्रिया आणि पेसा दाखल्याबाबतही माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास अनिल पवार, रवि पवार, कमल हिलम, सुनिल वाघ, कुंडलीक वळवी, सागर जाधव, रविंद्र वळवी, जाईबाई रण, सुनिता चौरे, सुमण रण, अंकुश रण, सुलाबाई मुकणे यांच्यासह इतर कातकरी बांधव उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×