Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Luxury Bus RTO Action : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरुद्ध पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष तपासणी मोहीम

Luxury Bus RTO Action

२१ दिवसांत ६६ वाहनांवर कारवाई; १३ लाख ७४ हजार रुपयांचा दंड आकारला, १० लाख ५६ हजार रुपयांची वसुली

marathinews24.com

पुणे – परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन करतात किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विशेष तपासणी मोही (Luxury Bus RTO Action) राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोषी आढळलेल्या ६६ लक्झरी बसवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा – सविस्तर बातमी 

१ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत परराज्यात नोंदणीकृत लक्झरी बसची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अग्निशामक यंत्र नसणे, जादा प्रवासी वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र संपलेले असणे, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (HSRP) नसणे, परवाना नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, मालाची वाहतूक करणे, अनुज्ञप्ती नसणे तसेच वाहनात अवैध बदल करणे आदी नियमभंग आढळून आले.

या कारवाईत १३ लाख ७४ हजार ३७० रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी १० लाख ५६ हजार ८७० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.

(Luxury Bus RTO Action)  या विशेष तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व लक्झरी बसच्या चालक व मालकांनी वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वैध परवाना व योग्यता प्रमाणपत्र बाळगावे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×