Breking News
Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’

Pune Drought Management : जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

Pune Drought Management : जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा; ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ (Pune Drought Management) जाहीर करण्यासाठी शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती अवलंबन्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार – सविस्तर बातमी 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, कृषी विभागाच्या रूपाली बंडगर, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ तसेच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टंचाई आराखडा तयार करा, उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करा, Pune Drought Management ज्या धान्याचे उत्पादन कमी झाले असेल त्याची साठेबाजी होणार नाही, यावर नियंत्रण ठेवावे, चारा पीक क्षेत्राचा अंदाज घ्या, पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची काळजी घ्या,७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागावर विशेष लक्ष द्या, अशा सूचना राऊत यांनी दिल्या.

बैठकीत तालुकानिहाय पर्जन्यमानाची ठळक वैशिष्ट्ये, तालुकानिहाय पावसाचा थंड कालावधी, खरीप हंगामातील पिकांची स्थिती, प्रधानमंत्री पिक विमा योजनेची तालुका निहाय अहवाल, फळ पिक विमा योजना मृगबहार तालुकानिहाय अहवाल, पीक कापणी वेळापत्रक, धरणातील पाणीसाठा,भूगर्भातील पाणी पातळी, चारा पीक क्षेत्र आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×