Breking News
Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’

Naval Kishore Ram Birthday : आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

Naval Kishore Ram Birthday : आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (IAS) यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका मुख्यालयातील उपमहापौर कार्यालयात सदिच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे स्वागत करून लोकप्रतिनिधी व पुणेकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या {Naval Kishore Ram Birthday) शुभेच्छा दिल्या.

गणेशोत्सवात विज्ञानाचा जागर; शिवाजी मंदिर मंडळाच्या चंद्रयान व तारांगण शोला उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते आयुक्त नवल किशोर राम यांचा शाल आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट देण्यात आले. अशोक स्तंभ आणि भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले हे स्मृतीचिन्ह काचेच्या पेटीत जतन करण्यात आले आहे. या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Naval Kishore Ram Birthday  सत्कार सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी उपमहापौर व आयुक्त यांच्यात पुणे शहरातील आगामी पायाभूत सुविधा, नागरी विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सुसंवादातून शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×