फुरसुंगीत ‘लोकसंवाद-२०२६’मधून महिला व बालकांसाठीच्या योजनांची जनजागृती; विविध हेल्पलाइन व कायद्यांची माहिती
marathinews24.com
पुणे – LokSamvad 2026 : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बाल संगोपन योजना, बालगृहे आणि अनुरक्षण गृहे, अनाथ मुलांसाठी असलेल्या योजना आदींसह महिलांसाठीच्या वन स्टॉप सेंटर, महिला राज्य गृह, समुपदेशन केंद्र आदी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधी – सविस्तर बातमी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय पुणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. २१) फुरसुंगी ता. हवेली येथील कामठे तरुण गणेश मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी संरक्षण अधिकारी कविता चौरे, अच्युत शेवाळे यांनी योजनांची माहिती दिली. LokSamvad 2026 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांसाठीच्या योजना, महिलांसाठीच्या योजना तसेच मिशन शक्ती हे अभियान, महिलांना तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक ११२,१०९१, १००, १०९८ ची माहिती देण्यात आली. महिलासाठी अस्तित्वात असलेला कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध कायदा अर्थात पॉश अधिनियम, बालविवाह कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग निदान विरोधी कायदा आदींबाबत माहिती देण्यात आली.
LokSamvad 2026 याप्रसंगी विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक सचिन गाढवे, लिपिक सुजित भिसे, गणेश मंडळाचे पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.























