Breking News
Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले

Crop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Crop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

marathinews24.com

पुणे – राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. Crop Damage Pune कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती – सविस्तर बातमी 

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची (Crop Damage Pune)तसेच पाणी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे उपस्थित होते.

कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पिकाची पाहणीकरून पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती घेतली. Crop Damage Pune पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये २ ते ३ आठवड्यांचा पावसाचा खंड पडला आहे. भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड असून, ४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असलेल्या तालुक्यांमध्ये बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांचा समावेश असल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली.

पावसातील दीर्घ खंडामुळे पुणे विभागातील खरीप पिकांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीची केवळ आकडेवारीच्या आधारे पाहणी न करता प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, कृषी व संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची अचूक नोंद करण्यात येत आहे. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन पंचनामे तसेच आवश्यक प्रस्तावांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×