Breking News
Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’

Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या Pune MLC Election 2026 द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे.

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेशोत्सवात महिला व बालकांसाठीच्या योजनांची जनजागृती – सविस्तर बातमी 

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

पुणे पदवीधर Pune MLC Election 2026 आणि पुणे शिक्षक मतदारसंघांतर्गत संबंधित पाचही जिल्ह्यांमध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली आदर्श आचारसंहिता २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संपुष्टात येणार आहे.

महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पार पाडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×