उंड्रीतील नागरिकाला अनोळखी एपीके लिंक उघडणे पडले महागात
marathinews24.com
पुणे – मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक करताच एकाच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख रुपये सायबर चोरट्यांनी स्वतःकडे वर्ग करुन फसवणूक केली आहे. ही घटना २१ ते २६ ऑगस्ट २०२६ कालावधीत उंड्री परिसरात घडली असून, याप्रकरणी ५० वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, (Undri Cyber Fraud) खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेला कामगार ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे उंड्री परिसरात राहायला असून, २१ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवली होती. त्या फाईलची लिंक उघडताच तक्रारदाराच्या बँकखात्याची संपुर्ण माहिती सायबर चोरट्याने स्वतःकडे घेतली. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत सायबर चोरट्याने त्यांच्या (Undri Cyber Fraud) बँकखात्यातील ५ लाख रुपये वर्ग करुन घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर तपास करीत आहेत.























