Breking News
Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले

पुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविले

Beed Theft News

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा धुमाकूळ

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवात देखावे पाहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. कसबा पेठ, शनिपार परिसरात या घडल्या. (Pune Ganeshotsav Jewellery Theft) याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक, युनीट तीनची कामगिरी – सविस्तर बातमी

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक परिसरात महिलेच्या गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, गणेशोत्सवात महिलांच्या गळ्यातील दागिने, रोकड, मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी गर्दीच्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, तरीही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात राहायला आहेत. त्या १८ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास जिजामाता चौक परिसरातील नवग्रह मंडळाजवळून निघाल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. पोलीस हवालदार अजिज शेख तपास करत आहेत.

सदाशिव पेठेतील शनिपार मंडळ परिसरात वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील १२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. Pune Ganeshotsav Jewellery Theft याबाबत महिलेच्या पतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.

शनिपार परिसरात २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीत राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र लांबविण्यात आले. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार गोंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×