Breking News
Pune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठार

भरधाव ट्रकची दोन मोटारींना धडक

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रक चालकाने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलावर घडली. ट्रकने उड्डाण पुलावरुन निघालेल्या दोन मोटारींना धडक दिल्यामुळे मोटारींचे नुकसान झाले. तसेच दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.

पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविले – सविस्तर बातमी 

किरण पवार (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार यश जयप्रकाश किरदत्त (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय ३७, रा. गोलसर, ता. इंडी, जि. विजयपुर, कर्नाटक) याला अटक केली. यश किरदत्त याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार यश किरदत्त आणि त्याचा मित्र किरण पवार हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावरुन रविवारी (२२ जून) पहाटे सव्वापाचच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रक चालकाने दुचाकीस्वार पवारला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर भरधाव ट्रकचालक पसार झाला. उड्डाणपुलावरुन निघालेल्या दोन मोटारींना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निीरक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार यश अणि त्याचा मित्र किरण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच किरणचा मृत्यू झाला होता. पसार झालेला ट्रकचालक अंदोडगी याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे तपास करत आहेत.

उड्डाणपुलावर तिसरा अपघात

मित्रांसोबत पार्टी करुन निघालेल्या मोटार चालकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी वडगाव उड्डाणपुलावर होती. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच अपघातानंतर भरघाव मोटार उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळली होती. अपघातात मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेले मित्र जखमी झाले होते. यापूर्वी वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×