Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविले

पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविले

 पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पालखी सोहळ्यात दोन भाविकांकडील मोबाइल चोरट्यांनी नेल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (२२ जून) प्रस्थान झाले. पुणे-सोलापूर रस्त्यावर रविवारी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्यावेळी भाविकांच्या गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी मोबाइल चोरून नेले.

माजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरण – सविस्तर बातमी 

शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, ओैंध) हे पुणे-सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्शनासाठी थांबले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेत असताना चोरट्यांनी त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाइल चोरून नेला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पांडे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत. तसेच हडपसर गाडीतळ परिसरात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे दर्शन घेत असताना नितीन साळुंखे (वय ४२, रा. घोटवडे, ता. मुळशी) यांच्या खिशातून ९ हजारांचा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेला. साळुंखे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार गव्हाणे तपास करत आहेत.

भाविकांचा ऐवज चोरीच्या घटना

पालखी सोहळ्यात महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडल्या. पालखी सोहळ्यातील चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. गर्दीत चोरट्यांनी भाविकांकडील मोबाइल, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या. काही भाविकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या नाहीत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×