Breking News
महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वार

बतावणी करुन ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविले…

बतावणी करुन ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविले...

ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध दाखल केला गुन्हा 

marathinews24.com

पुणे – बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कात्रज भागात घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचला; नदीपात्रात अडकलेल्या तरूणाची सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय महिला कात्रज भागातील शिवशंभोनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२३ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्यकडे बतावणी केली. या भागात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा ५५ हजारांची सोन्याची माळ लांबवून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

२० जून रोजी मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चोैकात मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी महिलेकडील रोकड, मोबाइल संच आणि दागिने लांबविल्याची घटना घडली होती. पोलीस असल्याची बतावणी, मोफत साडी वाटप, धान्य वाटप अशी आमिषे दाखवून चोरट्यांनी महिलांची फसवणूक केली आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून ११ लाखांचा ऐवज चोरला

फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात घडली. दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. ,सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या सदनिका बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून ११ लाखांचा ऐवज चोरला

दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी गुरुवार पेठेतील सोसायटीतील दाेन सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. विश्रांतवाडीतील तिरुपती पार्क सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली होती. १३ जून रोजी सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ रस्त्यावरील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला होता. शहर, तसेच उपनगरातील सोसायटीत शिरुन चोरटे बंद सदनिकांची पाहणी करुन चोरटे घरफोडी करत असल्याचे दिसून आले आहे. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा सोसायट्यांंमध्ये चोरटे शिरतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×