अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचला

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचला

नदीपात्रात अडकलेल्या तरूणाची सुटका

marathinews24.com

पुणे – नदीपात्रात अडकलेल्या महाविद्यालयीन तरूणाला अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. सोमवारी (दि.२३) सकाळी डीपी रस्त्यावरील पंडित फार्मजवळ ही घटना घडली आहे. डीपी रस्त्यावरील पंडीत फार्मजवळ असलेल्या मुठा नदीपात्रात तरुण अडकला असून, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्राला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख राजेश जगताप आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य करीत त्याचा जीव वाचविला आहे.

रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघात – सविस्तर बातमी 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याला वेग आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता असल्याने तरूण नदीपात्रातील कठड्याला धरून थांबला होता. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोरीचा वापर करुन नदीपात्रात अडकलेल्या युवकाची सुटका केली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दिली. बचावलेला तरूण मूळचा अहिल्यानगरचा असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. त्याचे मामा एरंडवणे भागात राहायला असून, सध्या तो मामाकडे राहायला आहे. घटनेची माहिती तरूणाच्या मामाला कळविण्यात आली. तरूणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी युवकाच्या माामाची चौकशी केली. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते, असे मामाने सांगितल्याचे अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले.

तातडीने मदत मिळाली नसती तर, तरूण वाहून गेला असता

पंडीत फार्म परिसरातील रहिवाशांनी घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दल आणि पोलिसांना दिल्याने तरूणाला तातडीने मदत उपलब्ध झाली. वेळेत मदत उपलब्ध झाली नसती, तर तरूण प्रवाहात वाहून गेला असता, असे सांगण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×