Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

स्वस्तात मोटार विक्रीचे दाखवले आमिष, पोलीस हवालदाराला ४ लाखांना गंडा

स्वस्तात मोटार विक्रीचे दाखवले आमिष, पोलीस हवालदाराला ४ लाखांना गंडा

एजंटविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कर्जाचे हप्ते थकल्याने खासगी वित्तीय संस्थेने जप्त केलेली मोटार स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवून वाहन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटने पोलीस हवालदाराला ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एजंटविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस हवालदाराने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रथमेश संजय गुगळे (रा. साईनगर सोसायटी, सातववाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलीस हवालदार आहेत. ते दररोज दुचाकीवरुन कामावर जातात. दुचाकी चालविल्यामुले त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी मोटार खरेदी करण्याचे ठरविले. एका खासगी वित्तीय संस्थेचे कर्जाचे हप्ते थकलल्याने मोटार जप्त करण्यात आली आहे. ही मोटार स्वस्तात मिळवून देतो, असे पोलीस हवालदाराच्या मित्राने सांगितले. मोटार खासगी वित्तीय संस्थेच्या खेड शिवापूर येथील गोदामात लावली आहे. ही मोटार वाहन खरेदी – विक्री व्यवहार करणारे एजंट प्रथमेश गुगळे याच्याकडे आहे. मी गुगळे याच्याकडून मोटार घेतली होती, असे मित्राने त्यांना सांगितले.
त्यानंतर पोलीस हवालदार खेड शिवापूर येथील गोदामात गेले. त्यांनी मोटार पाहिली. तेव्हा मोटारीची किंमत ४ लाख ८० हजार रुपये सांगितले. त्यानंतर चार लाख २० हजार रुपयांत मोटार देतो, असे सांगण्यात आले.

मोटार खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी पोलीस हवालदाराने गुगळे याला आवश्यक ती कागदपत्रे दिली. चार लाख २० हजार रुपये त्यांनी गुगळे याला दिले. त्यानंतर गुगळे हा गोदामात आला नसल्याचे समजले. पोलीस हवालदाराने गुगळे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुगळे याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते गुगळे याच्या घरी गेले. तेव्हा घराला कुलूप होते. आजी वारल्याने अहिल्यानगर येथे आलो आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर गुगळे याने टाळाटाळ सुरू केली. पैसे परत करण्यास नकार दिला. पैसे खर्च केल्याचे त्याने सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस हवालदाराने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×