Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

Crime News : पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

Crime Crime News : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा

कोथरूड डेपो प्रवासादरम्यान घडली घटना 

marathinews24.com

पुणे Crime News :  पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना २५ जूनला रात्री पावणेदहाच्या सुमारास कोथरूड डेपो प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी सांगलीत राहणार्‍या ६७ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात गांजा तस्करीचा प्रयत्न, सोलापूरच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला मूळची सांगलीतील असून, कामानिमित्त पुण्यात आली होती. २५ जूनला रात्री पावणेदहाच्या सुमारास महिला पीएमपीएल बसने कोथरूड डेपो परिसरातून प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. याप्रकरणी पोलीस अमलदार खरात तपास करीत आहेत.

लाईक, कमेंटवर पैसे मिळविणे पडले महागात

Crime News : व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणीला तब्बल २ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १२ ते १३ मे रोजी कोंढवा बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारक चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी कोंढवा परिसरात राहायला असून, १२ मे रोजी सायबर चोरट्यांनी तिला टेलीग्राम आयडीवरून मेसेज केला. त्यांच्या कंपनीच्या व्हिडिओला लाईक करण्यास सांगून तरूणीचा विश्वास संपादित केला. प्रत्येक लाईक आणि कमेंटवर पैसे मिळवून देण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी तिला केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणीला लिंक पाठवून ऑनलाईनरित्या गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल २ लाख रूपयांची फसवणूक झाल्यानंतर तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करीत आहेत.

महिलेचे २० हजारांचे मंगळसूत्र चोरीला

Crime News : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २२ दुपारी दोनच्या सुमारास हडपसरमधील रवीदर्शन चौकात घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमध्ये राहायला असून, २२ जूनला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी रवीदर्शन चौकात गेली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. दरम्यान, काही वेळानंतर महिलेला गळ्या मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार गव्हाणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top