Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

महिलेला सहाशे टक्क्यांचा नफा पडला १८ लाखांना

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

सायबर चोरट्यांकडून चार गुन्ह्यात ६७ लाखाची फसवणूक

marathinews24.com

पुणे – शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, महिलेला सहाशे टक्क्यांचा नफा पडला १८ लाखांना पडला असून, आर्थिक लाभाच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चार गुन्ह्यांत तब्बल ६७ लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

परदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी – सविस्तर बातमी

कंपनीत उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची सायबर चोरट्यांनी सहाशे टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १८ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ५१ वर्षीय उपमहाव्यवस्थापक महिलेच्या तक्रारीवरून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला ही ईऑन आयटी पार्कजवळील फॉरेस्ट काउंटी येथे राहते. ८ मे रोजी ती घरी असताना तिच्या मोबाईलवर ‘मार्गा पिलीप’ नावाच्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. त्याने महिलेला आपण युरोपमध्ये आयपीओ कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले, तसेच मोठ्या कंपन्यांशी संबंध असल्याचेही नमूद केले. त्यानंतर त्याने तिला १०६ सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले.

त्यानंतर एका आयपीओ गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देत ६०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १८ लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार ८ मे २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यान घडला.

दरम्यान, बाणेर परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय तरुणाला ‘शेअर्स ट्रेडिंग’विषयी ऑनलाईन माहिती देत सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याला विविध खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. या प्रकारातून तक्रारदाराकडून तब्बल ३५ लाख १३ हजार रुपये उकळण्यात आले. मात्र त्याला कोणताही नफा देण्यात आलेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार २२ फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत घडला.

तिसरा गुन्हा चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. यामध्ये सायबर चोरट्यांनी गोखलेनगरमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेशी टेलीग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांनी तिला विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. तिने हे टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला तिला काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. मात्र नंतर तिच्याकडून वेळोवेळी सव्वा सात लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी मोबदला देणे थांबवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल चौथ्या गुन्ह्यात सायबर चोरट्यांनी पैसे परत करण्याच्या बहाण्याने ६४ वर्षीय महिलेच्या मोबाईलचा ऑनलाईन ताबा मिळवला आणि तिच्या खात्यातून तब्बल ५ लाख ९७ हजार रुपये काढून घेतले. ही फसवणूक ५ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत घडली. याबाबतही महिलेने तक्रार दाखल केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×