Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे होणार अनावरण

थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे होणार अनावरण

प्रतिष्ठानतर्फे एनडीएत उभारणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावर

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. 4 जुलै रोजी आयोजित करण्यात आला असून अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

Maharashtra Krushi Din 2025 : देशाची भूक भागवणाऱ्या बळीराजाच्या सन्मानाचा दिवस – विशेष लेख सविस्तर वाचा 

अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सभारंभ सकाळी 10:45 वाजता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात या भावनेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले असून कुंदनकुमार साठे सचिव आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यासाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार्य केल्याने पुतळा उभा करण्याची परवानगी मिळाली. सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचेही पुतळा उभारण्यात सहकार्य लाभले आहे.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने साडेतेरा फुट उंचीचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही. 40 वर्षांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना अजेय योद्धा पेशवे यांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top