दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. कसबा पेठेत ही कारवाई करण्यात आली ईश्वर प्रशांत तुपसुंदर (वय २२, रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मयुर भोकरे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, कोयता जप्त – सविस्तर बातमी 

खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार अमोल आवाड आणि मयुर भोकरे हे गस्त घालत होते. त्यावेळी तुपसुंदर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याने पिस्तूल कसबा पेठेतील घरात ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्याने पिस्तूल एका पिशवीत ठेवल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, अमोल आवाड, पोलीस हवालदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, अमर पवार, गीतांजली जांभुळकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×