Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

हांडेवाडी चौकात ४ फर्निचर दुकानांना भीषण आग

हांडेवाडी चौकात ४ फर्निचर दुकानांना भीषण आग

अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर-कात्रज बायपास रोडवरील हांडेवाडी चौकात असलेल्या फर्निचर हाउस, सजावट फर्निचर, वीरभद्र फर्निचर आणि टेक्नोफास्ट इलेक्ट्रिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) घडली. आगीत प्रत्येकी दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या चार व्यावसायिक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर फर्निचर व इतर साहित्य जळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच काळेपडळ अग्निशमन केंद्राची फायरगाडी सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ आग विझविण्याचे काम सुरू केले.

वैमनस्यातून दोघांवर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

कोंढवा बुद्रुक येथील फायरगाडी व वॉटर टँकर, कोंढवा खुर्द येथील फायरगाडी, मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचा वॉटर टँकर, गंगाधाम येथील फायरगाडी, एरंडवणामधील वॉटर टँकर, हडपसर अग्निशमन केंद्राची फायरगाडी, स्थानिक व महानगरपालिकेचे टँकर मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग विझवताना एलपीजी गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. तसेच आगीच्या ठिकाणालगत पेट्रोल पंप तसेच शिवेंद्र हॉटेल असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

मात्र अग्निशमन दलाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे आग या परिसरापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टाळण्यात आला. अग्निशमन कार्यात स्टेशन ऑफिसर समीर शेख, अनिल गायकवाड, सुनील नाईकनवरे, प्रभारी अधिकारी विलास दडस, कैलास शिंदे, इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण आग विझवण्यात आली.

अग्निशमन दलाच्या तत्पर, धाडसी व समन्वयपूर्ण कार्यामुळे मोठी संभाव्य दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करत अग्निशमन दलाचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×