Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

वैमनस्यातून दोघांवर शस्त्राने वार

Lohgaon Rickshaw Driver Attack : सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार

वारजे भागातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वारजे भागातील रामनगर परिसरात घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय विलास सोंडे (वय २०, रा. रामनगर, वारजे) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेला साथीदार नितीन लक्ष्मण पद्माकर (वय २८, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उदय रोहिदास चाळके (वय ४०, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा अविनाश डावरे यांच्याशी वाद झाला होता. १४ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी सोंडे आणि साथीदार डावरे यांना मारहाण करत होते. त्या वेळी त्यांचा मित्र चाळके यांनी मध्यस्थी केली. भांडणात मध्यस्थी केल्याने आरोपी चिडले. त्यंनी तीक्ष्ण शस्त्र उगारून दहशत माजविली. आम्ही या भागातील भाई आहोत, असे सांगून दहशत माजविली. त्यानंतर त्यांनी डावरे याच्यावर तीक्ष्ण शस्त्रनो वार केले. मध्यस्थी करणारे चाळके यांच्यावर शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेला आरोपी सोंडे याला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक हंस तपास करत आहेत.

खासगी वसतिगृहातू लॅपटाॅप, मोबाइल चोरी

चंदननगर भागातील एका खासगी वसतिगृहातून दाेन लॅपटाॅप, मोबाइल संच चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगरमघील शेजवळ पार्क भागात खासगी वसतिगृह आहे. वसतिगृहात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लॅपटाॅप, मोबाइल संच असा एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल नुकताच चोरुन नेेला. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी हडपसर परिसरातील एका वसतिगृहातून चोरट्यांनी लॅपटाॅप आणि मोबाइल चोरुन नेले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×