Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

धर्मगुरुसह ८ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – प्रार्थनेतून कर्करोग, ट्यूमर असे असध्या आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढव्यातील एका प्रार्थनास्थळात ही घटना घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पास्टर केनेथ पॉल सिल्वे (रा. क्विन्स टाउन, चिंचवड) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला येरवडा भागात राहायला आहेत. त्या अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले धर्मगुरु हे चिंचवड परिसरात राहायला आहेत. रविवारी (१४ जून) रोजी दुपारी तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण हे प्रार्थनास्थळात गेले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकानंनी २० रुपये घेऊन महिलेला प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. ‘’कोणाताही आजार झाला असेल तर त्या भागावर हे पाणी लावा. त्यामुळे आजार कमी होईल’, असे कार्यकर्त्यांनी महिलेला सांगितले.

श्वान चावल्याने दगड फेकून मारले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

धमघुरनेु प्रार्थना स्थळात सभा घेतली. त्या वेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. शरीराच्या ज्या भागात आजार आहे.त्या भागावर उजवा हात ठेवा. कर्करोग, ट्यूमरसर कोणताही विकार असू देत देव तुम्हाला बरे करणार आहे’, असे धर्मगुरुने उपस्थितांना सांगितले. त्या वेळी फिर्यादी महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने चित्रीकरण केले. त्या वेळी तेथ असलेल्या महिला स्वयंसेवकांनी त्यांना मोबाइलवर चित्रीकरण करण्यास मनाई केली. तक्रारदार महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीला धक्काबुक्की करुन मोबाइलमधील चित्रफीत काढून (डिलिट) केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

जादुटोणा प्रतिबंधक कायदा, तसेच अन्य कायद्यातील कलमांन्वये धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×