Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

श्वान चावल्याने दगड फेकून मारले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

श्वान चावल्याने दगड फेकून मारले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

बोपोडी भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – श्वान चावल्याने एकाने डोक्यात दगड मारल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना बोपोडी भागात घडली. श्वानाला जीवे मारल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आलम शेख (वय २७, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साेनवणे यांनी ऑगी नावाचे श्वान पाळले होते. सोनवणे यांच्या श्वानाने आरोपी तरुणाचा चावा घेतला होता. श्वानाने चावा घेतल्याने तरुण त्याच्यावर चिडला होता. सोमवारी (१५ जून) पहाटे तरुणाने सोनवणे यांच्या श्वानाच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यानंतर सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. श्वानाच्या डोक्यात दगड घालून मारल्या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत. विश्रांतवाडी भागात गेल्या महिन्यात सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाने सफाई कामगाराचा चावा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगाराने भटक्या श्वानाला काठीने मारले होते. या घटनेत भटक्या श्वानाचा मृत्यू झाला होता. याबाबत एका प्राणी प्रेमी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×