Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाला लुटले

Digital Arrest Scam

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाला लुटण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. ज्येष्ठाकडील सोन्याची अंगठी, सोनसाखळी असा तीन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीच्या त्रासामुळे एकाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मांजरी भागात राहायला आहेत. ते १४ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातून निघाले होते. पुरातन महादेव मंदिराजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडविले. पोलीस असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी त्यांना बनावट ओळखपत्र दाखविले. या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या अहोत. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी सोन्याच्या दोन अंगठ्या, तसेच सोनसाखळी असा तीन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×