खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पत्नीच्या त्रासामुळे एकाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह मुलगा, तसेच मुलीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजीव मनोहर पायगुडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी मनीषा उर्फ मंगल, मुलगी स्मृती, मुलगा रोहित (तिघे रा. मांडवी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत रवींद्र मनोहर पायगुडे (वय ५५, रा. भगली हाॅस्पिटलशेजारी, बिबवेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उज्जैनमध्ये दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव पायगुडे यांना पत्नी, मुलगी, मुलाने शारिरिक आणि मानसिक त्रास दिला होता. त्यांच्या छळामुळे भावाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली, असे राजीव पायगुडे यांचा भाऊ रवींद्र यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.























