उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील युवकाचा पाय घसरल्याने नदीत बुडून मृत्यू
marathinews24.com
पुणे – मध्य प्रदेशातील उज्जैन येथे श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आदित्य चौगुले (वय १९, रा. साठेनगर, मोझे शाळेजवळ, लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य हा श्री महाकालेश्वराचा भक्त होता. तो उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शनासाठी गेल्यानंतर तो आई-वडिलांच्या संपर्कात होता. १० जून रोजी तो नदीत आंघोळीसाठी उतरले. त्यावेळी पाय घसरल्याने तो नदीत बुडाला. त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याचे आई-वडील चिंतेत होते.
“सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जूनला – सविस्तर बातमी
उज्जैनला रवाना झाले. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी ते पोलिसांकडे गेले. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी नदीत बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र आई-वडिलांना दाखविले. आई-वडिलांनी छायाचित्रावरुन ओळख पटविली. त्यानंतर त्याचा मृतदेहावर रविवारी (१४ जून) उज्जैन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्य हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या आदित्यचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोहगाव परिसरात शोककळा पसरली.






















