Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

“सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जूनला

"सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जूनला

विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सोमवारी (दि.१५) बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकारातील पुढील सुनावणी आता १७ जूनला होणार आहे. विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजची सुनावणी न्यायमुर्ती जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात पार पडली. ल सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड – सविस्तर बातमी 

विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अटक केल्यापासून २४ तासात न्यायालयात हजर करणे अपेक्षित असताना हजर केले नाही. गुन्ह्यात २२ दिवस उशिरा ताब्यात घेण्यात आले. या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, विशेष सरकारी वकील ऑड. उज्ज्वल निकम यांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध नोंदवला. मकोका लागू असल्याने तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित विचार करावा लागेल, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती, मात्र आता अचानक हा मुद्दा उपस्थित करून खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऑड.उज्वल निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत सांगितले की, सव्वा वर्षांपूर्वी आरोपपत्र दाखल होऊनही या खटल्याची गती मंद आहे. त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा, अशी विनंती न्यायालया समोर त्यांनी केली आहे.

ॲड. उज्ज्वल निकम काय म्हणाले

सुनावणी लवकर सुरू करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्याचे निकम यांनी सांगितले. लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. यावर प्रतिक्रिया देताना ॲड. निकम म्हणाले की, फॉरेन्सिक तपासानंतर जे काही प्राप्त झाले तेच आरोपी पक्षाला देण्यात आले आहे. मात्र जुने मुद्दे पुढे करून हा खटला जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती ॲड. निकम यांनी दिली. हा खटला पद्धतशीरपणे उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू असून, यापूर्वीही आरोपींकडून ‘D टू ऑपरेशन’ (D for Delay) चालवले जात असल्याचे आपण न्यायालयात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.

जयराम चाटेच्या जामीन अर्जावर १७ जूनला सुनावणी

ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, विष्णू चाटेच्या आजच्या अर्जावर परवा पर्यंत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसेच परवा कोणते साक्षीदार कधी तपासायचे याचा अहवाल न्यायालयात दाखल केला जाईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करण्यात येईल. दरम्यान, आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावरची पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×